लक्ष्मीदहिवडी / प्रतिनिधी
दर महिना दीड महिन्याला वादळी वारे, बदलते हवामान, अवकाळी पाऊस यामुळे शेतकर्यांची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण व पावसाच्या सरी पडत असल्याने डाळिंब, द्राक्ष, ज्वारी या पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिक जोपासण्यासाठी काढलेल्या कर्जाचा बोजा आता त्याच्या मानगुटीवर बसल्याने बळीराजा चिंताग्रस्त आहे. वर्षभरापासून शेतकर्यावरील निसर्गाची अवकृपा सुरूच आहे. गेल्या महिन्याभरात अवकाळी पावसाने द्राक्षे, डाळिंब, ज्वारी या पिकांना हादरा बसला होता. त्यातून कसेबसे शेतकरी सावरले होते. मात्र, लगेच आता दोन दिवस सुरू असलेल्या पावसाच्या वातावरणामुळे डाळिंबावर तेल्या व द्राक्षांवर दावण्या रोग फुलला आहे. ज्वारी पूर्णपणे भुईसपाट होऊन काळी पडली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहे. एकीकडे मालाचे भाव उतरले, निसर्ग माल पिकवू देईना. सरकार अनुदान जाहीर करेना, शेतकर्यांची व्यथा कोणी समजून घेईना. यातून निसर्ग व सरकार शेतकर्यांच्या मुळावर उठल्याची भावना शेतकरी व बागायतदार यांच्यामधून व्यक्त होत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment