पंढरपूर / प्रतिनिधी
बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर यांच्यावर ईश्वर वठार येथे खुनी हल्ला झाला असुन या हल्लय़ामागचे कारण मात्र अज्ञात असुन या हल्लय़ामागे राजकीय षडयंत्र असल्याची पंढरपूर तालुक्यात होत असुन हल्लखोरांनी माऊली हळणवर यांना मारहाण करतानातू लई पुढारपण करतो काय? तुला खलास करुन टाकील अशी धमकी दिल्याची फिर्याद तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली असुन माऊली हळणवर यांना जनकल्याण रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. माउली हळणवर हे शेतकरी संघटनेचे एक लढाऊ व झुंजार कार्यकर्ते म्हणुन जिल्ह्यात प्रसिध्द असून त्यांच्या कार्याची दखल घेत बळीराजा शेतकरी संघटनेने त्यांची नुकतीच सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.या हल्लय़ाबाबत माऊली हळणवर यांनी दाखल केलेल्या फिर्यादी नुसार माउली हळणवर हे आपल्या ट्रॅक्टरचे डिझेल नेण्यासाठी पंढरपूरहूण नारायण चिंचोली येथे येवुन ते बसस्टॉप वर थांबले असताना सदर आरोपीने तेथे त्यांना शिवीगाळ केली असता काही उपस्थितांनी आरोपींना समजुत घालुन घरी पाठवीले मात्र त्यानंतर ईश्वर वठार येथील आपल्या घराकडे जात असताना ईश्वर वठार-अजनसोंड रस्त्यावर प्रकाश सुखदेव चौगुले ,सुखदेव दगडु चौगुले व दगडू रोकडे या आरोपींनी फिर्यादीची मोटार सायकल अडवून तू लई पुढारपण करतो काय? तूला खलासच करतो असे म्हणत लोखंडी गजाने डोक्यात व शरीरावर फिर्यादीस व रामदास हळनवर यांना मारहाण केली.यामध्ये माउली हळणवर यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली असुन त्यांना पंढरपूरातील जनकल्याणर हॉस्पिटल मध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्र्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment