0

आधुनिक शेतीशिवाय पर्याय नाही : आ. भालके
  
दत्तात्रय नवत्रे -
मंगळवेढा तालुका आधुनिक शेतीकडे वळला आहे. याचाच एक भाग म्हणून दुसर्‍या टप्प्यात १00 शेडनेट हाऊस उभे करण्याचा मानस ठेऊन पहिल्या शेडनेट हाऊसचे भूमिपूजन आ. भारत भालके यांच्या हस्ते शिवसेना तालुका प्रमुख प्रा. येताळा भगत यांच्या शेतात करण्यात आले. यावेळी बोलताना आ. भालके म्हणाले, गेल्या वर्षी कृषी क्रांती फार्र्मस क्लबने उभारलेल्या २0 शेडनेटचा प्रकल्प यशस्वी ठरला आहे. यातून प्रेरणा घेऊन शेतकर्‍यांनी आधुनिक शेती करण्याचा प्रय▪करावा. सुशिक्षित मुलांनी नोकरीसाठी उंबरठे झिजवण्यापेक्षा स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आधुनिक शेतीची कास धरावी. तरूणांनी हा पर्याय स्वीकारणे सध्या गरजेचे आहे. या शेडनेट हाऊसला लागेल ती मदत करण्यास कटीबद्ध असल्याचेही आ. भालके यांनी सांगितले. जिल्हा कृषी अधीक्षक रफिक नाईकवाडी यांनी सांगितले की, सध्या शेतकर्‍यांनी एकत्र येऊन गटशेती केली तरच फायद्याची शेती होणार आहे. मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी जिद्दी व कष्टाळू असून कृषी विभागाने त्यांच्या कष्टाची दखल घेतली आहे. या विभागाकडून शेतकर्‍यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आत्मा गटाचे बरबडे, तालुका कृषी अधिकारी गजानन ताटे, सुनील डोके, हरिभाऊ यादव, शरद हेंबाडे, कृषीक्रांती फार्र्मस क्लबचे अध्यक्ष अंकुश पडवळे, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक, महाराष्ट्र बँकेचे अधिकारी तसेच मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, मोहोळ तालुक्यातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

 
Top