1)पॅरीसच्या दक्षिण भागातल्या लायन या उपनगरात गोळीबारापाठोपाठ एका रेस्टॉरंटमध्ये स्फोट घडवण्यात आल्याचे वृत्त आहे. दोन दिवसांत पॅरीसमध्ये तीन दहशतवादी हल्ले झाल्यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे.
02)दक्षिण पॅरिसमध्ये पोलिसांवर गोळीबार करणा-या एका हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात दोन पोलिसांसह तीन नागरिक या हल्ल्यात जखमी झाल्याचे समजते.
3) दक्षिण पॅरिसमध्ये गुरूवारी पुन्हा गोळीबार. कालच्या दहशतवादी हल्ल्यांनंतर आज एका पोलिस अधिका-यावर गोळ्या झाडण्यात आल्याचे वृत्त आहे.
4) सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी थरूर यांना कोणतीही नोटीस पाठवण्यात आलेली नाही - बी. एस. बस्सी, दिल्ली पोलीस आयुक्त.
5) जगभरात भारतीयांना त्यांच्या मूल्यांमुळे नावाजले जाते,त्यांच्याकडील पैशांमुळे नव्हे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6)जगाला भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत. प्रवासी भारतीयांमुळे भारताला जगाच्या नकाशावर ओळख मिळाली आहे - प्रवासी भारतीय दिनानिमित्तच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य
7)सिडनी कसोटी : तिस-या दिवसाखेर भारत ५ बाद ३४२. कोहली १४० वर तर वृद्धिमान सहा १४ वर खेळत आहे. भारत अद्याप २३० धावांनी पिछाडीवर आहे.
8)मुंबई मेट्रोच्या दरवाढीला मुंबई हायकोर्टाची मंजूरी, दरवाढीविरोधातील याचिका फेटाळली न्यायालयाचा रिलायन्सच्या बाजून निर्णय. मेट्रोचे सध्याचे दर १०, १५, २० रुपये. मेट्रोचा प्रस्तावित दर १०, २०, ३० आणि ४० रुपये.
9)नवी मुंबई : खारघर टोलनाक्याविरोधात शेकापचे आंदोलन सुरू.
10)गाझियाबादमध्ये १६ वर्षांच्या बालिकेवर सामूहिक बलात्कार, तिन्ही आरोपींना अटक.
11)भारताला लागोपाठ २ धक्के, रहाणे १३ तर रैना शून्यावर बाद. भारत ५ बाद २९९
12) लोकेश राहुलनंतर कर्णधार विराट कोहलीचेही शानदार शतक, विराटचे मालिकेतील चौथे शतक आहे.
13)सिडनी कसोटी: भारताला तिसरा धक्का, राहुल ११० धावांवर बाद. विराट कोहली शतकाच्या नजीक, भारत ३ बाद २७९
14)अभिनेता संजय दत्तची रजा आज संपणार, पुन्हा जाणार तुरूंगात
15)शेकापच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खारघर टोलनाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त, टोल न घेता वाहने सोडली जात आहेत.
16)नाशिक फेस्टिव्हल यंदा होणार नाही, गारपिटीमुळे यावर्षीचा फेस्टिव्हल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
17)लोकेश राहुलचे शानदार शतक, कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक. २५४ चेंडूत केल्या १०२ धावा. भारत २ बाद २३०
18)सिडनी कसोटी: विराट कोहलीचे शानदार अर्धशतक (नाबाद ६२) तर लोकेश राहुल (नाबाद ९७) शतकाच्या अगदी नजीक, भारत २ बाद २२०
19)सिडनी कसोटी: भारत २ बाद १५५, राहुलचे अर्धशतक (नाबाद ७१) तर कोहली ३१ धावांवर खेळत आहे.
20)पॅरिसमधील साप्ताहिकावर हल्ला करणा-यापैंकी एक दहशतवादी पोलिसांना शरण आल्याची माहिती - एएफपी
21)कोळसा कामगारांचा पुकारण्यात आलेला देशव्यापी संप अखेर मागे घेण्यात आल्याने वीजसंकट टळले.
22)पॅरीसमधील इस्लामी धर्मगुरूंनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.
23)पॅरीमधील दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे.
24)पॅरीसमधील दहशतवादी हल्ल्याचा शोध घेण्यासाठी अमेरिका फ्रान्सला मदत करणार - बराक ओबामा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
25)आरबीआयने आर्थिक घोटाळ्यांबद्दल माहिती गोळा करण्यासाठी को- ऑपरेटीव्ह बँकांना पॅनल स्थापनकरण्यास सुचवले आहे.
26)अरब लीग आणि अल- अझर संघटनांनी पॅरीसमधील हल्ल्याचा निषेध केला आहे.
27)पॅरीस मधील एका प्रार्थनास्थळाबाहेर कारमध्ये स्फोट घडल्याचे वृत्त आहे.
28)आंध्रप्रदेशातील मेहबूबनगरमध्ये जादूटोणा करत असल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीला गावक-यांनी जिवंत जाळले.
29) दहशतवादी हल्ल्यामध्ये चार्ली हेबदो या फ्रेंच मासिकाचे संपादक स्टीफन शारबोनियर हे ही बळी पडले आहेत. त्याखेरीज मासिकाचे मुख्य व्यंगचित्रकारही ठार झाले असून मृतांची संख्या १२ झाली आहे.
30)भारताने यापूर्वीच चार्ली हेब्दोवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिला होता, राष्ट्रीय तपास यंत्रणेने हेडलीप्रकरणी दिलेल्या अहवालात पैगंबराचे व्यंगचित्र छापल्याच्या निषेधार्थ चार्ली हेब्दोवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो असे म्हटले होते, सूत्रांची माहिती.
31) चार्ली हेब्दो मासिकाच्या कार्यालयावरील हल्ला निषेधार्हच,हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Post a Comment