सांगोला-सांगोल्या सारख्या ग्रामीण भागातील बामणी गावचा सुपुत्र व खवासपूर तालमीचा पठ्ठा पै.सुनील साळुंखे याने जिद्द, चिकाटी, व प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर ‘हिंद केसरी’होण्याचा बहुमान मिळवला. ही बाब तमाम सोलापूर जिल्ह्यासह तालुक्याच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याचे गौरव उद्गार आ.दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी ‘हिंद केसरी’पै.सुनील साळुंखे च्या सत्कार समारंभा प्रसंगी व्यक्त केले. प्रतिष्ठेचा समजला जाणारा‘हिंद केसरी’चा किताब मिळाल्यानंतर पैलवान सुनील साळुंखे यांचे व वस्ताद भारत भोसले यांचा सत्कारही यावेळी आमदार साळुंखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.सांगोला शहर व तालुक्यात जंगी स्वागत करण्यात आले. ‘हिंद केसरी’ झाल्यानंतर सुनील साळुंखे याने खवासपूर येथील श्री छत्रपती शिवाजीराजे तालमीस भेट दिली. यावेळी त्याचे ग्रामस्थ व वस्ताद भारत भोसले यांच्या वतीने ङ्गटाके ङ्गोडून जल्लोषात स्वागत करीत सत्कार केला. दुपारी २ वा. ‘हिंद केसरी’सुनील साळुंखे याचे शहरात आगमन होताच राष्ट्रवादी कॉंग‘ेस पार्टीच्या संपर्क कार्यालयासमोर हालगीच्या निनादात ङ्गटाक्याची आतिषबाजी करुन जंगी स्वागत केले. .सोलापूर विधानपरिषद सदस्य व साळुंखे-पाटील कुटूंबीयाच्या वतीने आ.दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या हस्ते हिंद केसरी पै.सुनील साळुंखे याचा मानाचा ङ्गेटा बांधून पुष्पहार देवून भव्य सत्कार केला. त्याचबरोबर पै.सुनील साळुंखे यास कुस्तीचे धडे देणारे खवासपूर तालमीचे वस्ताद भारत भोसले यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी सैनिक सदाशिव साळुंखे, साहेबराव पाटील, तानाजी पाटील, चंद्रकांत शिंदे, पोपट पवार, चेतन केदार, विजय येलपले, अनिल खडतरे, सोमनाथ लोखंडे, कल्याण कांबळे, आलमगीर मु‘ा, ऍड.संपतराव पाटील, अरुणभाऊ घुले, विजय पवार, भिकाजी बाबर, सचिन शिनगारे, प्रमोद घाडगे, साहेबराव ढेकळे, चांगदेव खाडे, समाधान तेली, सोमनाथ पैलवान, जि.प.सदस्या राणी दिघे, सखुताई वाघमारे, रंजना हरीहर, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंद केसरी पै.सुनील साळुंखे याचा जन्म सामान्य कुटूंबामध्ये झाला असला तरी त्याचे वडील सदाशिव साळुंखे यांनी सीमेवर लढत आपल्या मुलांना कुस्तीचे धडे लहानपणापासून दिले. स्वत:ची इच्छा असूनही प्रतिकुल परिस्थितीत आपल्याला कुस्ती क्षेत्रात नावलौकीक मिळवायचा होता मात्र त्यावेळी सोयीसुविधा अभावी शक्य झाले नाही म्हणून सदाशिव साळुंखे यांनी मुलगा हिंमत व सुनील साळुंखे यास कुस्ती क्षेत्रात उतरवले. पै.सुनील साळुंखे यांनी लहानपणापासूनच कुस्तीत प्राविण्य मिळविण्यास प्रारंभ केला. त्याने केेलेल्या मेहनतीच्या जोरावर तो आज ‘हिंद केसरी’झाला आहे. भविष्यात सुनीलने ऑलिंपिक स्पर्धेत आपले नाव उज्वल करावे अशा शुभेच्छा आ.दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी व्यक्त केल्या. यावेळी उपस्थितातून ‘हिंद केसरी’सुनील साळुंखे याचे अभिनंदन करीत भव्य सत्कार करण्यात आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment