पंढरपूर / तालुका प्रतिनिधी
गेल्या वर्षीपर्यंत साखर कारखान्यांना कॉँग्रेस-राष्ट्रवादी सरकारकडून मदत होत होती. केंद्रात तसेच राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर साखर कारखान्यांना कोणत्याही प्रकारची मदत जाहीर झालेले नाही. आपण केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे पंढरीत आल्यानंतर त्यांच्याकडे मदतीबाबतची मागणी केली होती. मात्र, शासनाने कोणत्याही प्रकारची मदत जाहीर केलेली नाही. यामुळे साखर कारखानदारी अडचणीत सापडली असल्याचे मत माजी आमदार सुधाकर परिचारक यांनी व्यक्त केले. श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी कराड रोडवरील पंतनगर येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी परिचारक बोलत होते. गेल्या पाच वर्षात ज्याप्रमाणे काम केले तसेच काम यापुढेही करावे. संचालक मंडळात प्रामाणिकपणे कारखाना चालविणारे लोक हवेत. गटाशी निष्ठावंत असणारे लोक पाहिजेत. यंदा ऊसाखालील क्षेत्र अधिक आहे. तसेच कारखानदारीपुढील अडचणीही वाढल्या आहेत. प्रामाणिकपणे काम करणार्यांची कदर नाही. आत्तापर्यंत कारखान्याचे हीत जपले आहे. चांगला दर दिला आहे या ाबाबीही लक्षात घ्यायला हव्यात. संचालक मंडळात काम करण्यास अनेकजण इच्छुक आहेत त्यातून २१ जणांना संधी मिळणार असल्याचे परिचारक म्हणाले. यावेळी बोलताना जिल्हा दूध संघाचे चेअरमन प्रशांत परिचारक म्हणाले, गेल्या २५ वर्षात पांडुरंग कारखाना चांगल्या पध्दतीने चालविला आहे. काही लोक अडचणी आणण्याचा प्रय▪करीत होते. त्याचा काहीही उपयोग झाला नाही. प्रोग्राम प्रमाणे ऊस तोडणी कार्यक्रम सुरू आहे. ऊसाचे क्षेत्र अधिक असल्याने यंदा मे पर्यंत कारखाना चालवावा लागणार आहे. सध्याचे साखरेचे दर लक्षात घेता एफआरपीप्रमाणे दर देणे कठीण आहे. आपली संस्था आपल्याला चांगल्या पध्दतीने चालवायची आहे. कोणत्याही प्रकारचा बट्टा लागेल असे काम आपण केले नसल्याचे सांगून, यापुढील काळात एकरी उत्पादन वाढीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे परिचारक यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे चेअरमन दिनकर मोरे, व्हा चेअरमन दिलीप चव्हाण, कृऊबा समिती सभापती दाजी भुसनर पाटील, माजी सभापती वसंतराव देशमुख, दिलीप घाडगे, कल्याण पाटील, हरिष गायकवाड, भगवान चौगुले, गंगाराम विभुते, वामनराव माने यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.
आणि प्रशांत परिचारक झाले भावूक
उपस्थितांना मार्गदर्शन करीत असताना संचालक प्रशांत परिचारक भावूक झाले. विधानसभा निवडणूकीनंतर कार्यकर्त्यांना सामोरे जात असताना परिचारकांना अश्रू अनावर झाले. विधानसभा निवडणूकीनंतरचा हा पहिलाच मोठा मेळावा होता. या निवडणूकीच्या निमित्ताने परिचारक गट पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसून येत होते.
Post a Comment