नवी दिल्ली : दिल्लीत सर्वाधिक मताधिक्य मिळवून जिंकणारे पहिले पाच उमेदवारही आम आदमी पक्षाचेच आहेत. भाजपसह काँग्रेस आणि इतर सर्व पक्षांचा ‘आप’ने दारुण पराभव केला आहे. भाजपने अवघ्या 3 जागांवर विजय मिळवला आहे, तर 'आप'ने दिल्लीत विधानसभेच्या 67 जागा जिंकत मोदींची लाट रोखली आहे. विकासपुरीतून लढलेल्या ‘आप’च्या महिंदर यादव यांनी तब्बल 1 लाख 16 हजार 210 मतं मिळवत भाजपच्या संजय सिंह यांचा तब्बल 68 हजार 126 मतांनी पराभव केला आहे.
दिल्लीत सर्वाधिक मताधिक्य मिळवलेले 5 आमदार
पक्ष मतदारसंघ उमेदवार मताधिक्य
आप विकासपुरी महिंदर यादव 68 हजार 126
आप सुल्तानपुरमाजरा संदीप कुमार 64 हजार 439
आप देवली प्रकाश 63 हजार 937
आप बवाना वेद प्रकाश 50 हजार 2
आप बदरपूर नारायणदत्त शर्मा 47 हजार 583
Post a Comment