0

सांगली -
माजी उपमुख्यमंत्री आर. आर. ऊर्फ आबा पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय अंजनी अंजनी या त्यांच्या मूळ गावी दाखल झाला आहे. आर. आर. पाटील यांच्या पार्थिवावर आज (मंगळवार ) दुपारी बाराच्या सुमारास अंजनीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आर. आर. पाटील (वय 57) यांचे सोमवारी निधन झाले होते . आबांच्या निधनामुळे राज्य सरकारने एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. आज सकाळी आर. आर. यांचे पार्थिव मुंबईहून तासगाव येथे आणण्यात आले. तासगावमधील बेलवंडी नाक्यापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती . या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते . तेथून त्यांचे पार्थिव अंजनी या त्यांच्या गावात आणण्यात आले. त्यांच्यावर होणाऱ्या अंत्यसंस्कारावेळी राष्ट्र अध्यक्ष शरद पवार , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अंजनी या छोट्या गावात एका सामान्य कुटुंबात आबांचा जन्म झाला होता . आर. आर. पाटील यांच्यातील नेतृत्व गुण हेरून माजी उपमुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांनी आबांना राजकारणाचे बाळकडू दिले . जिल्हा परिषद ते विधानसभा येथपर्यंतचा प्रवास आबांनी अल्पावधीतच पूर्ण केला . कोणतीही राजकीय पार्श्वभूमी किंवा वारसा नसलेल्य वर्षे गाजवली .

Post a Comment

 
Top