कृषी व पशूसंवर्धन मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते राज्यातील
पशूपालकांसाठी 18002330418 टोल फ्री फोन कार्यान्वित
----------------------------------------
दि.30 : ( मुंबई ) राज्यातील पशू पालकांना जनावरांच्या आजाराबद्दल मार्गदर्शन, पशूसंवर्धन विभागाच्या विविध योजना,जनावरांच्या सर्वसाधारण रोगांचे नियंत्रण व लसीकरण इत्यादीबाबत मोफत माहिती देणारा 1800 2300 418 हा नवीन टोल फ्री फोन आज राज्याचे कृषी व पशूसंवर्धन मंत्री एकनाथराव खडसे यांनी विधानभवन कार्यालयात कार्यान्वित केला.
या टोल फ्री फोनवरुन पहिले संभाषण करताना एकनाथराव खडसे यांनी, उन्हाळयात व आगामी पावसाळयात पशूंच्या संभाव्य आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक त्या लसी व इतर औषधे तयार ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच प्रश्नकर्त्या शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी सांगितले.
खडसे यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, पशूसंवर्धन विभागातर्फे दुधाळ जनावरे, शेळया-मेंढया, कोंबडया यांचे वाटप लाभार्थ्यांना केले जाते. याची माहिती वरील फोन नंबरवर मोफत मिळणार आहे. चारा उत्पादनाचा कार्यक्रम तसेच शेतकऱ्यांसाठी असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती सुध्दा या फोनवर मिळू शकेल.
राज्यातील पशूपालकांना पशूसंवर्धन विभागाची विविध माहितीhttp://ahd.maharashtra.gov.inया संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नव्याने कार्यान्वित झालेला टोल फ्री फोन नंबर कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यन्त उपलब्ध राहणार आहे, असे राज्याचे आयुक्त, (पशुसंवर्धन) डॉ.कुंभार यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी पशुसंवर्धन सचिव महेश पाठक, सहआयुक्त डॉ.हरिश्चंद्र गायकवाड व विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
-------------------------------------
-------------------------------------
Subscribe to:
Post Comments (Atom)
आपला सरकारी दवाखाना 9 ते12 चालते त्यानंतर डॉ त्याच्या गावी चालला जाते जर 12 वा नंतर जर आमचि गाय व बैल मैस बिमार जर पडली तर तिला कुठे घेऊन जानार आम्हि शेतकरी माणस मुम्हाला काय समजनार शेतकर्याचे दुख जनावर बिमार जरी पडल तर जेवन पण गिळल्या। जात नाहि राव कुरुपा करुन यांच्या वर तोडगा काडण्यात यावा साहेब ता कारंजा जि वाशिम
ReplyDelete