0

नाट्यमय घडोमोडीनंतर विधानपरिषदेच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य रामराजे नाईक निंबाळकर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. काँग्रेस उमेदवाराची माघार आणि सत्ताधारी भाजपा-शिवसेनेचा मतदानावरील बहिष्काराने सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध झाली.

मतदानाला काही तासांचा अवधी शिल्लक असताना शिवसेनेच्या सभापतीपदाच्या उमेदवार डॉ. निलम गोर्‍हे यांनी उद्धव ठाकरेंच्या आदेशावरून आपला अर्ज मागे घेतला. त्यानंतर महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सभापती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार शरद रणपिसे यांनीही आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या रामराजे नाईक निंबाळकरांचा सभापतीपदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला

Post a Comment

 
Top