0

जलसंधारणाच्या कामांमधील भ्रष्टाचार उघड
__________________________________
   
सोलापूर : जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांची दबंगगिरी पाहायला मिळाली. दुष्काळ निवारण निधीतील जलसंधारणाच्या कामामध्ये झालेला मोठा भ्रष्टाचार त्यांनी उघडकीस आणला आहे.
 
दुष्काळाचा कोट्यावधी रूपयाचा निधी अधिकारी आणि कंत्राटदार यांनी संगनमताने लाटल्याचा प्रकार समोर येताच त्याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे बंधाऱ्यावर दाखल झाले. मंद्रूप येथील दोन निकृष्ट बंधारे त्यांच्या उपस्थितीत पाडण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी केलेली ही कारवाई राज्यातली हि सर्वात पहिली आणि धाडसी कारावाई मानली जाते आहे.
 
🔸काय आहे भ्रष्टाचार ?
 
दुष्काळाच निवारण करण्यासाठी शासनाच्या वतीने जलसंधारणाची काम हाती घेण्यात आली होती.  पावसाच पाणी अडवून पाणी पातळी वाढावी या उद्देशाने सिमेंट बंधारे बांधण्यात येणार होते. सिंमेंट बंधारे बांधण्यासाठी कोट्यावधी रूपयाचा निधी जिल्ह्याला उपलब्ध झाला आणि कामेही सुरू झाली. मात्र प्रत्यक्षात काम करीत असतांना पंधरा लाखाचा बंधारा अवघ्या पाच लाखात पूर्ण करण्यात आला, तर सात लाखाचा बंधारा दोन लाखात पूर्ण करून उरलेली रक्कम इंजिनिअर आणि कंत्राटदार गडप करण्याच्या तयारीत होते. या सर्व प्रकरणाची कूणकूण जिल्हाधिकारी डॉ. तूकाराम मूंडे यांना लागली आणि ते थेट बंधाऱ्यावर दाखल झाले.
 
🔺जिल्हाधिकारी तुकाराम मुंडेंची दबंगगिरी
 
बंधाऱ्याच्या निकृष्ट बांधकामाच्या भ्रष्टाचारात इंजिनिअर आणि काही प्रशासकीय अधिकारीही सामील असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी दक्षिण सोलापूर तालूक्यातील दोन इंजिनअरला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तर या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी मुंडे यांनी चालवलीय. निकृष्ट दर्जाचे दोन्ही बंधारे जेसीबी बोलावून जमीनदोस्त करण्यात आले आहेत.
 
एकीकडे दुष्काळ म्हणजे शेतकऱ्यांवरच संकट त दुसरीकड दुष्काळ म्हणजे भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदारासाठी शासकीय तिजोरी लुटण्याची संधी हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या धाडसी कारवाईमुळे दुष्काळाचा निधी हडपणारे चेहरे उघडे पडले आहेत
__________________________________

__________________________________

Post a Comment

 
Top