0

नवी दिल्ली, 24 : राज्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंह यांनी आज २ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

      राज्यात वर्ष २०१४ मधे झालेल्या दुष्काळाच्या नुकसानाकरिता मदत म्हणून केंद्रीय कृषीमंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीने भागासाठी २ हजार रूपयांच्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) अंतर्गत राज्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी हा निधी मंजूर झाला आहे. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी भिषण दुष्काळाचा सामना करणा-या महाराष्ट्र राज्याला २०१३ मधे देण्यात आलेल्या ५०० कोटी रुपयांच्या अर्थ सहायाच्या चौपट ही रक्कम असल्याचे सांगितले.

Post a Comment

 
Top