0

मंगळवेढा तालुक्यातील महमदाबाद (शे) येथे बसवेश्‍वर जयंती, शिवाजी महाराज जयंती व आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेचे उद््घाटन मंगळवेढय़ाचे युवा उद्योजक समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. येताळा भगत, विदुल अधटराव, योगेश सावंत, मधुकर पाटील, प्रशांत शिलवंत आदी उपस्थित होते.

उद््घाटनानंतर बोलताना समाधान आवताडे म्हणाले की, प्रत्येक खेळाडूने फक्त टीव्हीसमोर बसून सामने पाहण्यापेक्षा स्वत: खेळावर भर देऊन स्वत:चा नावलौकिक मिळविला पाहिजे. खेळामुळे चांगला व्यायाम होतो. व्यायामामुळे शरीर चांगले राहते, त्यामुळे प्रत्येकाने मैदानी खेळ खेळले तरच निरोगी शरीर राहिल, म्हणून प्रत्येकाने खेळात सहभाग घेऊन खेळण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी या स्पर्धेत प्रथम येणार्‍या संघास अकरा हजार एकशे अकरा रूपयाचे बक्षिस जाहीर केले तर येताळा भगत यांनी सात हजार सातशे सत्त्याहत्तर रूपये बक्षिस द्वितीय क्रमांकासाठी जाहीर केले. तृतीय क्रमांकासाठी पाच हजार पाचशे पंचावन्न रूपये बक्षिस सामना समिती देणार आहे.

यावेळी कार्यक्रमासाठी अण्णासाहेब सुडके, सुभाष सुडके, सुनील सुडके, दादा शिरतोडे, बाळू सोनवले, मलका जुंदळे, विक्रम सुडके, भालचंद्र अनपट, संतोष सुडके आदी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top