0

कृषीक्रांती फार्र्मस क्लबने केला के.बी. एक्सपोर्ट कंपनीशी करार
कंपनी लागवडीपूर्वी दर ठरवून नंतर माल खरेदी करणार

मंगळवेढा तालुका सध्या शेडनेट शेतीमुळे राज्यभर चर्चेत आला आहे. अतिशय कमी पाण्यावर शेडनेटच्या माध्यमातून विक्रमी उत्पादन घेऊन दुष्काळी तालुक्यात तरूण शेतकर्‍यांनी वेगळी वाट निर्माण केली आहे. नुकतेच कृषीक्रांती फार्र्मस क्लबचे अध्यक्ष अंकुश पडवळे यांनी तालुक्यातील चाळीस शेतकर्‍यांना घेऊन फलटण येथील केबी एक्सपोर्ट कंपनीला भेट देऊन काही करार केला असून त्यानुसार काही शेतकर्‍यांचा भाजीपाला चक्क युरोपच्या बाजारपेठेत पाठविण्यात येणार असल्याचे पडवळे यांनी सांगितले. या कंपनीमार्फत दुधी भोपळा, भेंडी, मिरची, बेबीफॉर्म मका हा भाजीपाला शेतकर्‍यांना बियाणे व औषधे मोफत देऊन पिकवला जातो. लागवडीपूर्वीच मालाचा दर ठरवून कंपनी माल खरेदी करते, त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी एक्सपोर्ट भाजीपाला पिकविण्यासाठी तयार झाले असून त्या शेतकर्‍यांना आता या कंपनीमार्फत युरोपची बाजारपेठ मिळणार आहे. या भेटीवेळी कंपनीचे सचिन यादव यांनी कंपनीची सर्व माहिती देऊन शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कृषीक्रांती फार्र्मस क्लबचे हरिभाऊ यादव, शरद हेंबाडे, दिनेश लेंगरे, दीपक घुले, नितीन घुले, डोके, महादेव धोत्रे, राजू तुंगळे, सतीश शिंदे, अँड़ धनंजय हजारे, राजू चौगुले, सुनील चौगुले यांच्यासह चाळीस सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

 
Top