0

लक्ष्मीदहिवडी येथे बसवेश्‍वर जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्‍वर युवक संघटनेच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरामध्ये १0१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम, मोटारसायकल रॅली, ग्रामस्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आले. ग्रामस्वच्छता अभियानामध्ये गावातील प्रमुख रस्ते, गल्ली बोळ स्वच्छ करून कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस शिवानंद पाटील, धनंजय पाटील, सचिन पाटील, सोमनाथ यावलकर, नितीन लिगाडे, सागर पाटील, सरपंच विकास सोनवले, सदस्य अनिल पाटील, प्रकाश जुंदळे, बसवेश्‍वर पाटील, महादेव स्वामी, बच्चू, जालगिरे, दत्ता तोडकरी, संतोष पाटील, ग्रामसेवक सचिन शिवशरण उपस्थित होते.

Post a Comment

 
Top