0


---------------------------------------------
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छत्तीसगड दौऱ्यावेळी, एका जिल्हाधिकाऱ्यांनी गॉगल लावूनच स्वागत केल्याने, त्यांना नोटीस धाडण्यातआली आहे. छत्तीसगडच्या रमण सिंह सरकारने जगदलपूरच्या कलेक्टरना नोटीस पाठवून, यापुढे खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे.धक्कादायक म्हणजे राज्य सरकारने ज्या अधिकाऱ्याला नोटीस पाठवली आहे, ते अमित कटारिया वेतन म्हणून अवघा एक रुपया घेतात.9 मे रोजी रायपूर विमानतळावर जगदलपूरचे कलेक्टर अमित कटारिया यांनी डोळ्याला लावलेला गॉगल न उतरवता मोदींचं स्वागत केलं. मात्र गॉगल लावून स्वागत केल्याने रमणसिंह सरकारने त्याला आक्षेप घेत थेट नोटीस धाडली आहे.पण याबाबत पंतप्रधान कार्यलयाला काहीही आक्षेप नसताना, राज्य सरकारने हेपाऊल का उचललं, असा सवाल उपस्थित होत आहे.कोण आहेत अमित कटारिया?मूळचे हरियाणाचे असलेले अमित कटारिया हे 2004 चे आयएएस अधिकारी आहेत. अमित कटारिया हे एक इमानदार ऑफिसर म्हणून ओळखले जातात. त्यांनी जिथे-जिथे पद भूषविलं आहे, त्या ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. कटारिया जेव्हा रायपूर महापालिकेचे आयुक्त होते, तेव्हा त्यांनी अवैध बांधकामविरोधात मोहिम उघडली. इतकंच नाही तर कर्तव्य म्हणून चालत जाऊन शहराचा आढावा घेणं, ही त्यांची खासियत आहे. विकासाला विरोध करण्याऱ्या राजकाऱ्यांना त्यांनी तीव्र विरोध केला आहे.महत्त्वाचं म्हणजे कटारिया हे वेतन म्हणून अवघा एक रुपया घेतात.त्यांनी छत्तीसगडमधील सरकारी गृहनिर्माण प्रकल्प लाँच करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
-------------------------------------------

Post a Comment

 
Top