सांगोला / तालुका प्रतिनिधी
तहसिलदार व महसूल प्रशासनाच्या हालचालीवर पाळत ठेवणार्या वाळू माफियांनी वाहनाचा पाठलाग करणार्या पत्रकार, तहसिलदार व पोलीसाच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रय▪केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मांजरी व बामणी, ता.सांगोला याठिकाणी घडली आहे. दरम्यान तहसिलदारांनी पाळत ठेवणार्या तीन गाड्या जप्त केल्या असून गाड्यातील व्यक्ती पसार झाल्या आहेत. पंढरपूर व मंगळवेढय़ातील भीमा नदीच्या पात्रातून रात्री-अपरात्री मोठय़ाप्रमाणात वाळूचे उत्खनन करून ट्रक, टीपर मधून क्षमतेपेक्षा अधिक व विना परवाना वाळूची वाहतूक केली जात आहे. भीमा नदीतून उत्खनन केलेली वाळूची वाहतूक सांगोला तालुक्यातून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, आदी शहराकडे केली जात आहे. तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी महसूल प्रशासनाला आदेश दिले असून स्वत: रात्री-अपरात्री हायवे वरुन गस्त ठेवून कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान सांगोला शहरातील वाढेगांव नाका याठिकाणी शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास काही पत्रकार व पोलीस एका हॉटेलमध्ये चहा घेत असताना एक अनोळखी बोलेरो जीप रस्त्यावर उभी होती. यावेळी सपोनि ज्ञानेश्वर कर्चे यांनी बोलेरो जीपची चौकशी करुन हवा सोडण्याचा प्रय▪करताच एका इसमाने ही जीप माझ्या पाहुण्याची आहे असे सांगितले. यावेळी पोलीसांनी सदरची जीप पोलीस ठाण्याकडे नेत असताना त्या इसमाने संगेवाडी येथून चोरटी वाळू भरुन ट्रक येत असल्याचे सांगितले. पोलीस पत्रकारासह संगेवाडीकडे गेले व परत सांगोल्याकडे येत असताना वाळू माफियांनी मांजरी ते बामणी दरम्यान पत्रकार, पोलीस व तहसिलदाराच्या वाहनावर हल्ल्याचा प्रय▪केला. मात्र सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा पोहोचली नसली तरी पोलीस व पत्रकाराच्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांतून दिवसभर चर्चा ऐकावयास मिळत होती. वाळू माफियांवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या महसूल खात्याच्या गस्ती पथकातील एक तलाठी कर्मचारी वाळू माफियांना तहसिलदारांच्या हालचालीविषयी माहिती देत होता. मात्र कर्तव्यदक्ष तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी संबंधीत तलाठी, कर्मचार्याला वेळीच ओळखून त्याच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment