0

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत प्रथमच बबनराव आवताडे यांनी मंगळवेढय़ासाठी किंगमेकर भूमिका बजावल्यामुळे प्रथम मंगळवेढय़ाला झुकते माप मिळाले आहे. दूध संघाच्या निवडणुकीत बबनराव आवताडे यांचे नाव पहिल्यापासून चर्चेत होते. मंगळवेढा तालुक्यात दूध संस्थेचा आवताडे यांना मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. जसे दिवस जवळ येतील, त्यावेळी जिल्हा दूध संघाच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळत गेली. दूध संघाच्या निवडणुकीच्या या अगोदरचा इतिहास पाहिला तर मंगळवेढय़ास नगण्य स्थान मिळत होते. यंदा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत बबनराव आवताडे यांनी अर्ज भरल्यानंतर चांगली रंगत आली. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी झालेल्या बैठकीत आवताडे कडक धोरण अवलंबले होते. आवताडे जागा सोडण्यास तयार नव्हते. मंगळवेढय़ाच्या वाट्याला दिलेल्या दोन जागासाठी उमेदवार निश्‍चित झाले होते. परंतु सर्वांना समान संधी मिळावी म्हणून विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शब्दाला मान मनाचे मोठेपण दाखवत दुसरी संधी मोहिते-पाटील गटाला दिली. मंगळवेढय़ास मिळालेल्या चार जागेचे श्रेय आवताडे यांना जाते. पंढरपूरमध्ये मोठय़ा प्रमाणात दूध संस्था असून सभासद आहे. त्या मानाने मंगळवेढय़ात कमी सभासद आहे. तरी सुद्धा पंढरपूरपेक्षा मंगळवेढय़ाला चार संचालक व पंढरपूरला एक संचालक मिळाला. बबनराव आवताडे यांनी या निवडणुकीत किंगमेकर भूमिका बजावल्यामुळे मंगळवेढय़ाच्या पारड्यात मोठे वजन पडल्याचे बोलले जात आहे. मंगळवेढय़ाला मिळालेल चार जागा या आवताडे कुटुंबामुळे मिळाल्या असल्याची चर्चा मंगळवेढय़ातून होत आहे.

Post a Comment

 
Top