मंगळवेढा महसूल खात्याने बिगर पावती वाळू वाहतुक करणार्या २९ मालट्रकवर शासनाच्या नवीन आदेशाप्रमाणे पाचपट दंडाची आकारणी करून ९१ लाख ६४ हजार ८00 एवढा दंड ठोठावून ट्रक व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सिध्दापूर येथील भीमा नदीच्या पात्रातील वाळूचा जाहिर लिलाव केला असून सुर्योदयानंतर वाळू उपसा करण्यास बंदी असताना राजरोसपणे वाळू उपसा होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना प्राप्त होताच त्यांनी पोलिस व महसूल खाते यास तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्याप्रमाणे सांगली, कोल्हापूर, मिरज, सातारा या भागात जाणारे एकूण २९ ट्रक पकडण्यात आले. तहसिलदार पुनाजी कोथेरे यांनी २९ गाड्यांची तपासणी केली असता १७९ ब्रास वाळू अधिक होती. या सर्व गाड्यांकडे शासनाची अधिकृत पावती नसल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी जिल्हयातील ११ तहसिलदारांना दि.१३ जून रोजी पाचपट दंड आकारण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार मंगळवेढय़ातील २९ वाळू वाहनांवर प्रथमच कारवाई केल्याने शासनाला मोठा महसूल मिळाला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment