रामेश्वर जुंदळे खून प्रकरण
लक्ष्मीदहिवडी / प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहिवडी येथे माजी ग्रा.पं. सदस्य रामेश्वर जुंदळे यांचा दि. २७ जून रोजी भरदुपारी गोळ्या घालून खून झाला होता. खून होऊन १३ दिवस झाले. मात्र, अद्याप तपासात काहीच प्रगती झाल्याचे दिसत नाही. खून कोणत्या कारणासाठी झाला हे ही अजून स्पष्ट नसताना खून अनैतिक संबंधातून झाला असावा असा तर्क, निष्कर्ष काढणे घाईचे असल्याचे रामेश्वर जुंदळे यांचे बंधू बसवेश्वर जुंदळे यांनी 'पुण्य नगरी'शी बोलताना सांगितले. खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करून आरोपींना पकडण्यासाठी दिवसरात्र एक केले. खून होऊन १३ दिवस झाले, अद्याप कोणतेही धागेदोरे हाती लागल्याचे किंवा तपास लागल्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यांच्या संबंधित लोकांची, नातेवाईकांची तसेच फोनद्वारे ज्यांच्याशी संपर्क होता, त्या सर्वांची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. मात्र, अद्याप कोणत्या प्रकारातून खून झाला, हे स्पष्ट झाले नाही. तरीही माध्यमांना अनैतिक संबंधातून खून झाला असावा असे सांगणे चुकीचे आहे. कोणताही ठोस पुरावा हाती लागल्याशिवाय तर्क काढणे चुकीचे आहे. रामेश्वर जुंदळे यांचा खून अनैतिक संबंधातून झाला की दुसर्या कोणत्या कारणावरून याचा तपासच निश्चितपणे अजून लागला नाही. विनाकारण तर्क काढून अनैतिक संबंधातून खून झाला असावा हे म्हणणे चुकीचे असल्याचे बसवेश्वर जुंदळे यांनी 'पुण्य नगरी'शी बोलताना सांगितले.
Post a Comment