0

प्रत्येकजण वापरू लागला प्रचाराचा वेगवेगळा फंडा

: घरा-घरात, बाप-लेकात, भावा-भावात, भावकित, नात्यागोत्यात, आळी-आळीत भांडणं तंटे लावून देण्याचा सरकारी कार्यक्रम म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक! अशा अनेक प्रकारच्या काव्य रचना सध्या सोशल  मिडियात झळकवले  जात आहे ग्रामपंचायतीसाठी ४ ऑगस्ट रोजी निवडणुक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक तरुण उमेदवारांनी सोशल मिडियांचा व्हॅटस् अ‍ॅप च्या माध्यमातून आपला प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागात देखील सोशल मिडियावर ग्रामपंचायत निवडणुकीची धूम पहावयास मिळत आहे. राजकारणाचा पाया मजबूत करणारी निवडणुक म्हणुन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे पाहिले जाते. त्यामुळे या निवडणुकीत निवडून येण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळा प्रचाराचा फंडा वापरताना दिसतात. त्याचाच एक भाग म्हणुन सध्या व्हॅटस् अ‍ॅप सारख्या सोशल मिडियाचा प्रचारासाठी वापर होत आहे. यामध्ये आपण गावासाठी काय करणार? निवडणुक चिन्ह, प्रभाग क्रमांक आदी माहिती याद्वारे प्रत्येकाकडे पोहंचविण्याची धडपड उमेदवार करताना दिसत आहेत. मोठ-मोठे बॅनर, भित्तीपत्रके आदी प्रचार साधनांपेक्षा आता सोशल मिडियाचे माध्यम सुखकर बनले आहे. यंदा ब-याच ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तरुणांनी उडी घेतली आहे. त्यांच्यासाठीचेही संदेश सोशल मिडियावर झळकत आहेत. ‘गावात प्यायला नाही शुद्ध पाणी, गरजवंताला राहायला नाही घर, वेळेवर मिळत नाही दाखले, सारे कसे चिरीमिरीला सोकले, गायब झाली गटारे, अन् कोरडं पडलं जलयुक्त शिवार, ही तुंबलेली विकासाची कोंडी ये तरुझ मित्रा लढ तू ग्रामपंचायत लढ’ यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचारासाठी फक्त आठवडाभराचा कालावधी असल्यामुळे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहंचण्यासाठी उमेदवार प्रत्येक मार्गाचा अवलंब करताना दिसत आहे. जरी सध्या दुष्काळी परिस्थिती असली तरीही निवडणुकीचा हंगाम सुकाळात दिसत आहे. या निवडणुकीत पक्षाची अधिकृत चिन्हे नसल्यामुळे रोजच्या वापरातील वस्तूंची चिन्हे निवडणुक चिन्ह म्हणुन देण्यात येतात. त्यामुळे चिन्हामुळेही निवडणुक रंगतदार बनते. पुर्वी चिन्हावर शिक्का मारायचा होता. आता मशिनचे बटन दाबून उमेदवार निवडायचा आहे. त्यामुळे मतदारांना समजून सांगण्यात उमेदवार व त्यांच्या कार्यकत्र्यांची धावपळ सुरु असल्याचे दिसत आहे.

Post a Comment

 
Top