सदस्य व ग्रामसेवक यांना वेगवेगळ्या तारखांच्या नोटीसा ?
सदस्यामध्ये संभ्रमाचे वातावरण ?
प्रशासनचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर
लक्ष्मीदहिवडी / प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यात नुकत्याच मुदत संपणार्या १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या असून या आठवड्याभरात सरपंच, उपसरपंच निवडी होणार आहेत. पण या निवडीच्या तारखाचा घोळ निवडणूक शाखेकडून होत असून दररोज एक नवीनच तारीख जाहीर होत आहे. यामध्ये महमदाबाद (शे) येथील ग्रामपंचायत सदस्यांना २८ ऑगस्टची नोटीस व ग्रामसेवकाला ३0 ऑगस्टच्या निवडीची नोटीस देऊन निवडणूक शाखेने अकलेचे तारे तोडले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेश क्र. १११३/२0१५ च्या २५ ऑगस्टच्या पत्रानुसार २८ ऑगस्ट रोजी निवडणूक असल्याची कोतवालामार्फत नोटीस मिळाली. त्यानंतर ग्रामसेवक कांबळे यांनी गावची सरपंच, उपसरपंच निवड ३0 तारखेला होणार असल्याचे सांगितले. त्यांना सदस्यांनी २८ तारखेची नोटीस दाखविली तर ग्रामसेवकांनीही त्यांना ३0 तारखेची जिल्हाधिकार्यांची आदेश क्र . १११४/२0१५ ची २५ तारखेच्या नोटीसामध्ये ३0 तारखेला होणार असल्याची नोटीस दाखविली. त्यामुळे सदस्यामध्ये एकच खळबळ उडाली असून नक्की निवड कोणत्या तारखेला? याविषयी सदस्यामध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २६ ऑगस्ट आणि २७ ऑगस्ट रोजी दोन वेगवेगळया तारखेचे पत्र देण्यात आल्यामुळे हा गोंधळ उडाला आहे. २५ ऑगस्ट रोजी दिलेल्या पत्रामध्ये २८ ऑगस्ट रोजी निवड असल्याचे सांगण्यात आले होते पण नियमानुसार तीन दिवस अगोदर नोटीस देणे आवश्यक आहे. २५ ऑगस्ट रोजी नोटीस काही सदस्यांना मिळाली नाही. यामुळे परत २६ ऑगस्ट रोजी पत्र देवून ३0 ऑगस्ट रोजी निवड होणार असल्याचे पत्र प्रशासनाने दिले आहे.
२८ तारखेच आणि ३0 तारखेची दोन पत्रे दिली होती. जिल्हाधिकारी कार्यालयातून हा गोंधळ झाला होता, पण ग्रामसेवकांना दिलेल्या पत्रानुसार ३0 तारखेलाच निवड होईल. ३0 ऑगस्ट रोजी निवड होणार असल्याबाबतचे पत्र सदस्यांनाही देण्यात येत आहे. - एन.बी. नाईक, निवडणूक अधिकारी, मंडल अधिकारी, मारापूर.
Post a Comment