0
पंढरपूर – आमदार पंकजा मुंडेंनी महायुतीत मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या चर्चांना अपरिपक्व असल्याचे म्हटले असून पुन्हा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने राज्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्ष आमदार पंकजा मुंडे पालवेंनी अप्रत्यक्षरित्या या नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.
मागील काही दिवसांपासून महायुतीच्या प्रमुख पक्षांमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावरून स्पर्धा सुरु असताना, पुन्हा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने राज्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्ष आमदार पंकजा मुंडे पालवे यांनी निवडणुकीपूर्वीच या चर्चा म्हणजे राजकीय अपरिपक्वता असल्याचे म्हटले आहे.
आज पंढरपुरात आमदार पंकजा मुंडे पालवे यांची पुन्हा संघर्ष यात्रा आली होती. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. महायुतीचे घटक पक्ष असणारे शिवसेना आणि भाजप मध्ये सध्या मुख्यमंत्री पदावरून मतभेद टोकाला जात असतानाच पंकजा मुंडे पालवे यांनी या सर्वाना जनतेच्या मताचा आदर करण्याचा सल्ला दिला आहे.
सध्या महायुतीची सत्ता येण्याचे वातावरण असताना यावेळी सर्वांनी आपली जबाबदारी पाडत काम पाहिजे. सत्ता येण्यापूर्वीच मुख्यमंत्री पदावरून वक्तव्य करणाऱ्या नेत्याबद्दल नाराजी व्यक्त करत, पंकजांनी आपण आत्ताच याबाबत चर्चा केली तर जनतेत चुकीचा संदेश जाईल असे म्हटले आहे.
Next
Newer Post
Previous
This is the last post.

Post a Comment

 
Top