0
नवी दिल्ली – निवडणूक रिंगणात अनेकवेळा एकाच नावाचे दोन किंवा जास्त उमेदवार उभे असतात. समान नाव असल्यामुळे मतदार मात्र गोंधळात पडतात. पण यावेळी निवडणूक आयोगाने जी यंत्रणा सादर केली आहे, त्यामुळे हा गोंधळ दूर होणार आहे. कारण, ईव्हीएमवर आता उमेदवाराच्या नावापुढे त्या उमेदवाराचे छायाचित्रही दिसणार आहे.
याच पार्श्‍वभूमीवर डमी उमेदवारांच्या गोंधळातून मतदारांना सावध करण्यासाठी वकील सुनील गोयल यांनी ईव्हीएमवर उमेदवाराचे छायाचित्र छापण्याची सूचना केल्यामुळे मतदानाचा हक्क बजावताना आपला उमेदवार निवडणे मतदारांसाठी सोपे होईल. ही सूचना निवडणूक आयोगाला पटली असून, त्यादुष्टीने काम सुरू केले आहे. वर्षअखेरीस जम्मू काश्मीर आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत ही यंत्रणा वापरली जाऊ शकते

Post a Comment

 
Top