गरवा – शाळेत विद्यार्थ्यांना दारू वाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार झारखंडमधील गरवा जिल्हयातील एका शाळेत उघडकीस आला असून एवढेच नव्हे तर अश्लिल चित्रफिती देखील ह्या विद्यार्थ्यांना दाखविण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
कुदरूम जनजातीय आवासीय विद्यालयातील हा प्रकार ‘पीपल्य युनियन फॉर सिव्हिल लिबर्टी’ च्या पथकाने उघडकीस आणला आहे. विद्येच्या मंदिरातच दारू वाटण्यात येत असल्याने, शाळेचे मुख्याध्यापक यांना जाब विचारण्यात आला. तेव्हा मात्र मुख्याध्यापक गणेशसिंह मुंडा यांनी जे समर्थन केले ते ऐकून तर सगळेच अवाक झाले. ते म्हणाले की, ‘ शिक्षक काय किंवा विद्यार्थी काय, या गावातील सर्वच गावकरी दारू पितात. येथे मुलाचा जन्म झाल्यापासून बाळाला बाळकडू म्हणून दारू देण्यात येते.
या प्रकरणी झारखंडचे ग्रामविकास मंत्री के. एन. त्रिपाठी यांनी चौकशीचे आदेश दिले असून विद्यालयातील हा प्रकार गंभीर असून चिंतेचा आहे, या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर यात जे दोषी म्हणून आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्रिपाठी यांनी सांगितले आहे.
Post a Comment