नवी दिल्ली- भारत दौर्यावर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे येणार असतानाच भारतीय हद्दीत चीनी सैनिकांनी पुन्हा घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे.
चीनच्या ३०० सैनिकांनी १०० भारतीय जवानांना लडाखमधील चुमूर भागात घेरल्याचे वृत्त आहे. इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाचे ७० जवान चीनी सैनिकांना माघारी परतवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती येथील प्रसार माध्यमांनी दिली आहे.
यापूर्वी लडाखमधील डेमचोक भागामध्ये सीमेपासून ५०० मीटर आत घुसून चीनी सैनिकांनी रविवारी घुसखोरी केली होती. इतकेच नव्हेतर त्यांनी तिथे तंबूही ठोकले होते.
Post a Comment