मंगळवेढय़ात एटीएम धारकांना येत आहेत बनावट कॉल्स
मंगळवेढा / प्रतिनिधी विविध बँकांमधील खाती असणार्या व ए.टी.एम. वापरणार्या ग्राहकांना पासवर्ड विचारून त्यांच्या खात्यावरून हजारो रूपये लुटल्याच्या दोन घटना मागील काही महिन्यात घडल्या असून आता पुन्हा असे बनावट कॉल एटीएम धारकांना येऊ लागल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवेढा परिसरात सध्या एका नंबरवरुन एटीएम ग्राहकांना फोन येत आहेत. पहिल्यांदा फोनवरील व्यक्ती थेट एटीएम धारकांचे नाव सांगून तुम्हाला ५ आकर्षक भेट मिळाल्याचे आमिष दाखवले जाते. त्यात हॉलीडे पॅकेज, रिस्ट वॉच, मेडिक्लेम, गिफ्ट व्हाऊचर व एक हजार रूपयांची दोन कुपन्स मिळणार असून त्यापोटी तुम्हाला फक्त ६ हजार ९९९ रुपये भरावयाचे आहेत. ते भरण्यासाठी ते त्यांच्या वरिष्ठांशी फोन जोडतात व वरिष्ठदेखील हीच माहिती पुन्हा सांगून तिसरीकडे फोन ट्रान्सफर करतात. त्यावेळी तिकडूनही आपले एटीएम समोर ठेवा असे सांगण्यात येते व एटीएमवरील माहिती विचारून आपल्या खात्यातून पैसे काढण्याचा त्यांचा कट शिजत असतो. ज्यावेळेस त्यांना हवी ती माहिती मिळते त्यावेळी त्यांच्या फोनचा संपर्क होऊ शकत नाही. तोपर्यंत ऑनलाईन लूट झालेली असते. मंगळवेढा पोलीस ठाण्यात सायबर क्राईमबाबत प्रभावी अशी यंत्रणा नसल्याने अशी लूट झाल्यानंतर पोलिसांकडून गुन्हे दाखल करून घेण्यास टाळाटाळ होते. जर एखादा गुन्हा दाखल झालाच तर त्याची चौकशीदेखील होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment