0

मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार भारत भालके यांना सुमारे ९ हजार मताने विजय मिळाला. पंढरपूर शहर व ग्रामीण भागात आ.भालके व परिचारक यांना बरोबरीने मते मिळाली. परंतू मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागात भारत भालके यांना चांगले मतदान मिळाले व निर्णायक अशी आघाडी मिळाली. दरम्यान, ही आघाडी मिळवून देण्यासाठी दक्षिण भागातील पंचायत समितीचे माजी उपसभापती दादा गरंडे, पंचायत समितीचे सभापती निर्मला काकडे यांचे पती तानाजी काकडे, हुन्नूर आश्रम शाळेचे प्रमुख जयंत साळे, रड्डेचे सुरेश कोळेकर या चौघांनी महत्वाची भूमिका बजावली. गरंडे, काकडे, साळे, कोळेकर या चौघांनी भोसे गटातून निर्णायक अशी आघाडी आ. भालकेंना मिळवून दिली. निवडणूकी पूर्वी दक्षिण भागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार प्रशांत परिचारक यांचे पारडे जड होते. त्यातच राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांची नंदेश्‍वरला येऊन सभा घेतली. असे असले तरी चेअरमन सुरेश कोळेकर यांनी या भागात आमदार भारत भालकेंना मताधिक्य देत तानाजी काकडे, जयंत साळे, दादा गरंडे यांनी यांनी संपूर्ण परिस्थिती बदलून दाखविल्याचे चित्र समोर येत आहे. नंदेश्‍वरच्या सभेला गावापेक्षा बाहेरील लोक अधिक दिसत होते. या उलट मतदानाच्या वेळी कपबशी कमी चालली आणि हात जास्त चालला अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. निवडणूकीपूर्वी भालकेंनी विकास कामे केली, संपर्क ठेवला हे स्पष्ट असले तरी भालके पराभवाच्या छायेतून बाहेर येऊन विजयाची करण्यामध्ये दक्षिणेतील चौघा नेत्यांनी विशेष प्रय▪केले. हेच दक्षिण भागातील परिचारक सर्मथकांना समजले नाही. परिस्थिती बाहेर गेल्यानंतर मंगळवेढा शहरातील परिचारक सर्मथकांनी मंगळवेढय़ात तुम्ही मागे आहात, तुम्हाला पंढरपूरह १0 हजाराचे मताधिक्य मिळवावे लागेल असे सांगितले. या सर्मथकांनी गेल्या चार वर्षात दुध संघातून केलेली मदत, अर्बन बॅँकेतून केलेली मदत, पांडूरंग मधून केलेली मदत, युटोपीयन कारखान्यावर झालेली नोकरभरती या सर्व जमेच्या बाजू असताना मंगळवेढय़ातून मताधिक्य देण्याची जबाबदारी या प्रमुख कार्यकर्त्यांची असताना अखेरच्या क्षणी त्यांनी माघार कशी घेतली. यापेक्षा फिक्सींग झाले का, माजी मंत्री ढोबळेंचा फोन आला का? यावर तालुक्यात चर्चा होत आहे.

Post a Comment

 
Top