कोरडवाहू विकास अभियानांतर्गत शेतकर्यांना निकृष्ट साहित्य पुरविल्याची तक्रार
पैसे भरून पाच महिन्याने साहित्य मिळाले, पण बंद अवस्थेत
सदर फवारणी यंत्र बदलून द्या किंवा पैसे भरत द्या,
शेतकर्यांची मागणी
लक्ष्मीदहिवडी / प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहिवडी हे गाव कोरडवाहू विकास अभियानामध्ये असून या गावाला प्रत्येक वर्षाला एक कोटी याप्रमाणे तीन वर्षात तीन कोटी खचरून कृषी विभागाकडून विविध प्रकारचे साहित्य, ट्रॅक्टर, फवारणी यंत्र (एच.टी.पी.) मिळत आहेत. लक्ष्मीदहिवडीतील २७ शेतकर्यांनी पाच महिन्यापूर्वी फवारणी यंत्रासाठी ९ हजार ७00 रूपये भरले होते. त्या फवारणी यंत्राचा पुरवठा शेतकर्यांना झाला असून ती फवारणी यंत्रे चालत नसल्याची लेखी तक्रार कृषी अधिकार्याकडे शेतकर्यांनी केली आहे. कृषी विभागाकडून ९ हजार ७00 रूपये भरून घेऊन फवारणीसाठी इंजिन व एच.टी.पी. कृषी विभागाकडून पुरवठा करण्यात आला. ते फवारणी यंत्रे शेतकर्यांनी शेतात आणून चालू करण्याचा प्रय▪केला. तेव्हा कुणाचेही फवारणी यंत्र व्यवस्थित चालले नाही. अनेकांची इंजिन सुरूही झाली नाहीत. यावेळी आपली फसवणूक झाली की काय म्हणून शेतकर्यांनी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधला असता, तालुका कृषी अधिकार्यांनी सदर प्रश्न सोडविण्याचा प्रय▪केला. पण 'त्या' मेकॅनिकलाही इंजिन सुरू झाले नाहीत. मेकॅनिकने काहीही न सांगता सदर गावातून काढता पाय घेतल्याने सदर सर्व शेतकर्यांनी लेखी अर्जाद्वारे चांगल्या प्रतीचे इंजिन द्या अथवा आम्ही भरलेले पैसे परत द्या, अशी मागणी केली आहे. अनेक शेतकर्यांनी पैसे भरून या योजनेचा लाभ घेण्याचा प्रय▪केला. मात्र, त्यांच्या पदरी निराशा पडली असून आता तालुका अधिकारी गजानन ताटे काय निर्णय घेतात, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
माझी नवीन डाळिंब बाग आहे. पहिल्यांदाच बहार धरला असून कृषी विभागातून फवारणी यंत्रासाठी पैसे भरले. पैसे भरूनही चार महिने फवारणीयंत्र मिळाले नसल्याने पाठीवरील पंपाने मी बाग फवारू लागलो. पण गेल्या पंधरा दिवसात हे साहित्य मिळाल्याने मला आनंद झाला होता. पण ते बागेत आणून चालू करण्याचा प्रय▪केला. तेव्हा हे इंजिन सुरूच झाले नसून याचा मला फार मनस्ताप झाला आहे. - राजकुमार जालगिरे, शेतकरी.
Post a Comment