मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील दुष्काळी जनतेने मला भगघोस मतदान केले आहे. या गावांना आता पाणी दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, या शब्दात नवनिर्वाचित आमदार भारत भालके यांनी आपला विश्वास व्यक्त केला. मतमोजणी दिवशी ३५ गावाने विशेषत: दक्षिण भागातून जनतेने मला मुबलक मतदान केलेले दिसून आले. मला त्या रात्री रात्रभर झोप आली नाही, मी पुन्हा एकदा ठाम निश्चिय केला. ज्या प्रयत्नाने योजना मंजूर करुन आणली आहे, त्यापेक्षा दुप्पट प्रय▪करुन या भागात पाणी मिळवून देण्याचा निर्धार मी केला आहे. राज्यात आघाडी सरकार जावून भाजपाचे सरकार आले आहे. मी भाजपा सरकारकडून या कामासाठी निधी उपलब्ध करेन, विरोधी बाकावर बसणार असलो तरी विधायक कामात मदत तर चुकीच्या कामाबद्दल आरडाओरडा करुन ते काम होऊ देणार नाही, असे धोरण आम्ही ठरविले आहे. राज्यात सर्वाधिक दुष्काळाचा फटका पश्चिम महाराष्ट्रातील मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांना बसतो. निवडणुकीत विकास कामावर गप्पा मारल्या जात होत्या. मी मात्र या गावाला पाणी देणार हे ठासून सांगत होतो. पाणी दिल्याशिवाय शेती करता येत नाही, कोणताही उद्योगधंदा करता येत नाही. पाण्याशिवाय जीवन व्यर्थ आहे. दुष्काळी जनता कोंबड्या व शेळय़ा पाळून जगत आहे. हे चित्र बदलण्यासाठी मी माझी आमदारकी पणाला लावणार आहे. असा ठाम विश्वास आ. भालके यांनी व्यक्त केला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment