0


मंगळवेढा / प्रतिनिधी
अरळी (ता. मंगळवेढा) येथील भीमा नदीच्या पत्रातून बेकायदा वाळू उपशाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी नाजणी मौलवी या महिला तलाठय़ास प्रांताधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी निलंबित केले आहे. अरळी येथील वाळू लिलावाची मुदत दि. ३0 सप्टेंबर रोजी संपूनही येथे रात्रीच्या वेळी बेकायदा वाळू उपसा होत होता. कोल्हापूर, मिरज, सांगली येथील ७५ ते ८0 ट्रक वाळूची वाहतूक करत होते. याबाबत येथील नागरिकांनी महसूल अधिकार्‍यांकडे तक्रार करूनही या अवैध वाळू उपशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते  यामुळे लाखो रूपयांचा महसूल बुडाला असल्याची तक्रार करण्यात आली होती.

अरळी येथील अवैध वाळू उपशाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी तलाठी मौलवी यांना निलंबित करण्यात आले आहे. यापुढे अवैध वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाईल. -               श्रावण क्षीरसागर, प्रांताधिकारी, मंगळवेढा.

Post a Comment

 
Top