मुंबई :
जनतेच्या सरकारच्या कार्यालयातील चकरा कमी करण्यासाठी, लवकर सेवा हमी विधेयक आणू अशी घोषणा राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. मुख्यमंत्रिपदाची सुत्रं हाती घेतल्यानंतर, फडणवीस यांनी तात्काळ आपल्या कारभाराला सुरुवात केली आहे. शपथविधी संपल्या-संपल्याच फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांच्या वतीनं आयोजित सत्काराला उत्तर देताना, आपलं सरकार हे लोकाभिमुख असेल असं आश्वासन दिलं. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या सरकारचं व्हिजन स्पष्ट केलं.
कार्यक्षम आणि पारदर्शक सरकार : महाराष्ट्रात पहिल्यादाच भाजपला मुख्यमंत्रिपद मिळालं आहे. आजवर विरोधी पक्षाचा नेता म्हणून अनेक पत्रकार परिषद घेतल्या, पण आज सत्ताधारी म्हणून पत्रकार परिषद घेताना दडपण वाटत असल्याचं फडणवीस म्हणाले. यावेळी बोलतांना, आपलं सरकार कार्यक्षम आणि पारदर्शक असेल असा दावा फडणवीस यांनी केला. त्यामुळं आपल्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थारा नसेल असंच सुचवण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला. राज्याची 15 वर्षात विस्कटलेली घडी नीट करण्याचा प्रयत्न राहील. कामं करताना चुका होतील, पण त्यामध्ये बेईमानी नसेल याची खात्री देतो, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. जिथे गरज तिथे अॅक्शन घेऊ :
आघाडी सरकारमधील सिंचन घोटाळ्यावर कारवाईबाबत विचारलं असता, जिथे गरज असेल, तिथे आम्ही अॅक्शन घेऊच असं सूचक विधान फडणवीस यांनी केलं. त्यामुळं सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि संबंधितांवर भाजप सरकार कारवाई करणार का? याचीच सर्वांनी उत्सुकता लागली आहे. सेवा हमी विधेयक आणणार :
ग्राहकांचा होणारी फसवणूक आणि वाढत्या तक्रारी वाढता, सेवा हमी विधेयक आणण्याची ग्वाही नुतन मुख्यमंत्र्यांनी दिली. सेवा हमी विधेयकाच्या माध्यमातून ग्राहकांना सेवेची हमी मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. एखादी सेवा किती दिवसात मिळते, मिळते की नाही याला कायद्याची सुरक्षा मिळेल. त्यामुळं जनतेला सरकारी कार्यलयात चकरा मारायला लागू नयेत, यासाठी हे विधेयक महत्त्वकांक्षी ठरेल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. तसंच सर्वसमावेश योजना राबवण्यावर आपल्या सरकारचा भर असेल असंही फड़णवीस यांनी स्पष्ट केलं.
विकासाचा असमतोल दूर करणार :
वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर बोलताना आमचा अजेंडा हा राज्याचा समतोल विकास करणं हा आहे. महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणणं हाच आपला उद्देश असल्याचं सांगत, त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नाला बगल दिली. आमचा फोकस विकासावर, सर्मसमावेशक विकास हेच आमचे ध्येय असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
शिवसेनेशी सकारात्मक चर्चा :
शिवसेनेला सरकारमध्ये सामावून घेण्यासाठी आणि त्यांचा पाठिंबा घेण्याच्या दृष्टीनं सकारात्मक चर्चा सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. तसंच मंत्र्यांचं खातेवाटप उद्या होणार असल्याचं देखील फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment