0

लक्ष्मीदहिवडी / प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहिवडी येथील ओढय़ांवर कृषी विभागाने पुढाकार घेऊन लोकसहभागातून वनराई बंधारे बांधले असून या बंधार्‍यामुळे वाहते पाणी आडल्याने जमिनीतील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. मंगळवेढा तालुका कृषी अधिकारी गजानन ताटे यांनी सर्व मंडल कृषी अधिकार्‍यांना वनराई बंधार्‍यासंदर्भात सूचना दिल्यानंतर अनेक गावातील ओढय़ांवर असे वनराई बंधारे तयार करुन पाणी अडविण्याचा प्रय▪केला जात आहे. लक्ष्मी दहिवडीचे कृषी सहाय्यक भोई व मंडल अधिकारी अशोक कांबळे यांनी पुढाकार घेऊन गावातील लोकांना वनराई बंधार्‍याचे महत्त्व पटवून दिले व श्रमदानातून ओढय़ांवर वनराई बंधारे तयार केले आहेत. या बंधार्‍यात पाणीसाठाही झाल्याचे दिसत आहे.      

Post a Comment

 
Top