0

✒ अमोल फुलारी   

: भारतीय लष्कराच्या तोफखाना दळासाठी 814 अत्याधुनिक तोफा खरेदी करण्याच्या 15,750 कोटी रुपयांच्या प्रस्तावास संरक्षण दलांसाठी शस्त्रस्त्रे खरेदीसंबंधीच्या उच्चस्तरीय परिषदेने (डिफेन्स अॅक्विङिाशन कौन्सिल- डीएसी) शनिवारी मंजुरी दिली. यामुळे लष्कराची सुमारे 3 वर्षापासूनची अपूर्ण राहिलेली गरज पूर्ण होणार आहे.
नवे संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘डीएसी’च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संरक्षणमंत्री या नात्याने र्पीकर यांचा हा पहिलाच मोठा निर्णय आहे; मात्र भारतीय हवाईदलाच्या अॅव्हरो मालवाहू विमानांचा ताफा बदलण्यासाठी नवी पर्यायी विमाने पुरविण्याचा टाटा सन्स व बोइंग या कंपन्यांचा संयुक्त प्रस्ताव व मूलभूत वैमानिक प्रशिक्षणासाठी 1क्6 स्वीस पिलॅटस विमाने घेण्याचा प्रस्ताव यावरील निर्णय लांबणीवर टाकण्यात आले.
_____________________________________

Post a Comment

 
Top