0


कोलकाता : पश्चिम बंगालच्या बरुईपूरमध्ये अविकसित चार हात आणि चार पाय असलेल्या एका बाळाचा जन्म झाला आहे. बाळाच्या आई-वडिलांनी त्याला देवाचा अवतार असल्याचं म्हटलं आहे. बाळाचं शरीर भारतीय देवांशी मिळतंजुळतं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे बाळाचं नाव ‘भगवान बालक’ (गॉड बॉय) ठेवण्यात आलं आहे. कारण हिंदू मान्यतांनुसार देवी-देवतांचे अनेक हात आणि पाय असतात. राज्यातील कानाकोपऱ्यातून अनेक नागरिक त्याला पाहायला येत आहेत. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांना गर्दीला नियंत्रित करण्यासाठी फार मेहनत करावी लागत आहे, कारण रस्त्यांवर नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. हे बाळ जन्मत: असामान्य आहे, अविकसित हात आणि पाय हे एकत्र जोडलेल्या जुळ्या बाळांचा परिणाम आहे. मात्र कुटुंब या नव्या सदस्यामुळे फारच खुश आहे आणि त्याला हिंदू देव ब्रह्माचा अवतार असल्याचं सांगत आहेत. नर्सने बाळ अविकसित असल्याचं सांगितलं. “पण हा देवाकडून मिळालेला चांगला संकेत आहे. खरंतर हा एक चमत्कार आहे. हे देवाचं बाळ आहे. हिंदू देवांचे अधिक हात-पाय असतातच,” असं कुटुंबियांचं म्हणणं आहे. शेजारच्या गावातून अनेक लोक बाळाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. “पहिल्यांदा या मुलाबाबत समजलं तेव्हा मला संशय होता. पण मित्र आणि इतर लोकांकडून त्याच्याबाबत ऐकल्यानंतर माझी उत्सुकता इथे घेऊन आली,” असं मुलाला पाहण्यासाठी आलेल्या 67 वर्षांच्या चुक्का राव यांनी सांगितलं. तर पोलिसांच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे की, “हे बाळ असामान्य आहे. यात देवाचं काहीही देणंघेणं नाही. पण लोक वेडे झाले असून बाळाला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. दुसरीकडे गल्लीमध्ये शेकडो जण रडत आहेत, काही दहशतीखाली असून विचार करत आहेत की ही जगाच्या अंताची सुरुवात आहेत. मी माझ्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत असं कधीही पाहिलं नाही.” बाळाच्या कुटुंबातील सदस्यांनी हे अतिशय सामन्य बाब असल्याचं म्हटलं आहे. बाळाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि बाळाला पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहे, हेदेखील सामान्य आहे.

Post a Comment

 
Top