सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष व डाळिंबाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे बागायतदार हवालदिल झाले आहेत. या नुकसानीचे पंचनामे करुन एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्या अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे बागायती शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले.विशेषत: द्राक्ष व डाळिंबाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदरच तेल्या सारख्या रोगाने डाळिंब शेती अडचणीत आली असूताना या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. डाळिंब बागांसाठी एकरी एक लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबचे निवेदन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष दिपक भोसले, तानाजी बागल, विजय रणदिवे, छगन पवार, अतुल गायकवाड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment