--------------------------------------
सांगलीतील वाळवा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हॉट्सअॅपवर एका होतकरू विद्यार्थ्याने स्वत:ला श्रद्धांजली वाहून आपली जीवनयात्रा संपवल्याने वाळवा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. महादेव कुंभार असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.
घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे तो शिक्षणासोबतच एका कारखान्यात काम करत होता. रविवारी महादेवने आपल्या वर्तुळातील मित्रांना व्हॉट्सअॅपद्वारे स्वत:च्या फोटोवर, ‘कै. महादेव कुंभार यास भावपूर्ण श्रद्धांजली’ असा मजकूर लिहून पाठवला.
महादेवच्या मित्रांनी हा संदेश तितक्या गंभीरतेनं घेतला नाही. मात्र सोमवारी आई-वडिल कामावर गेल्यानंतर त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मात्र असं असलं तरी महादेवच्या आत्महत्येचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही.
-------------------------------------------
Post a Comment