मंगळवेढा / प्रतिनिधी
निवडणूक आयोगाने १ जानेवारी २0१५ या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार १ डिसेंबर २0१४ रोजी मंगळवेढा तालुक्यातील सर्व मतदार केंद्रावर प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार असून १ ते १६ डिसेंबर २0१४ या कालावधीत मतदारांचे दावे स्वीकारण्यात येणार आहेत. नवमतदारांनी नावे नोंदवून या पुर्ननिरीक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार पी.आर. कोथेरे यांनी केले आहे. प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रमामध्ये ज्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट नाहीत, अशा मतदारांनी तसेच १ जानेवारी २0१५ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण होत असलेल्या नवमतदारांनी आपले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह तालुक्यातील मतदार मदत केंद्र, बी.एल.ओ. यांच्याकडे जमा करून त्याची पावती घ्यावी. तसेच नाव वगळणी, नाव, पत्ता यातील दुरूस्ती, स्थलांतर याबाबतही अर्ज दाखल करून योग्य ती दुरूस्ती करून घ्यावी. मतदार याद्याच्या विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रमांतर्गत ७ ते १४ डिसेंबर २0१४ या दोन्ही दिवशी रविवारी असल्याने या दिवशी मतदार नोंदणीचा विशेष कार्यक्रम राबविण्यात येईल. त्या दिवशी सर्व मतदार केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून ज्या पात्र मतदारांची नावे मतदार यादीत नाहीत. अशा नवमतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ठ करण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती तहसीलदार कोथेरे यांनी दिली. सर्व पात्र मतदारांनी त्याचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याची खात्री तहसील कार्यालयातील मतदार मदत केंद्र अथवा बी.एल.ओ. यांच्याकडे करावी. नाव नसल्यास नमुना सहा मधील अर्ज आवश्यक कागदपत्रासह दाखल करावा, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment