0


------------------------------------------
✒ - बसवेश्वर बेडगे दि.23:-  (नागपुर)येत्या महिन्याभरात एलबीटी शंभर टक्के बंद करू, असं आश्वासन केंद्रीय दळण-वळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं. नागपुरात विकासाचं राजकारण या चर्चासत्रात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी मंचावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा उपस्थित होते.

“भाजपने जनतेला एलबीटी रद्द करण्याचं आश्वासन दिलं आहे. या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. येत्या महिनाभरात शंभर टक्के एलबीटी रद्द करू” असं गडकरी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेगळ्या विदर्भाला कधीच विरोध केला नसल्याचा दावा, यावेळी गडकरींनी केला. स्वतंत्र विदर्भाप्रती आपली आणि मुख्यमंत्र्यांची बांधिलकी असल्याचंही गडकरी म्हणाले. तसंच त्यासाठी पूर्ण प्रयत्न करू, असंही त्यांनी नमूद केलं.

त्याचसोबत महाराष्ट्रात सेना आणि भाजपमधली मैत्री कायम राहावी अशी इच्छाही  गडकरींनी बोलून दाखवली.

--------------------------------------------

Post a Comment

 
Top