0


_____________________________________

- बिहारमधील सिवान जिल्ह्यात रविवारी रात्री भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते श्रीकांत भारती यांची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका लग्न समारंभाहून घरी परतत असताना भारती यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. भारती यांच्या हत्येनंतर आज (सोमवार) त्यांच्या समर्थकांकडून रस्त्यांवर टायर पेटवून रास्ता रोको करण्यात आला. तसेच राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या भागात सध्या तणावपूर्ण शांतता असून, अधिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

श्रीकांत भारती हे सिवान लोकसभा मतदार संघातील भाजपचे खासदार ओम प्रकाश यादव यांचे निकटवर्तीय होते. भारती यांनी 2010 मध्ये विधानसभा निवडणूक लढविली होती. पण, त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
________________________________________

Post a Comment

 
Top