0

चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात गवत काढायला गेलेल्या एका महिलेचा वाघाने केलेल्या वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मात्र वाघाच्या भितीने तीचा मृतदेह आणण्याचं धाडस न झाल्याने गावकऱ्यांनी वनाधिकाऱ्यांना बोलवलं. मात्र हे अधिकारी तब्बल 4 तासांनी आल्याने गावकरी संतप्त झाले आणि त्यांनी वनअधिकाऱ्यांना चांगलीच अद्दल घडवली. चंद्रपुरात होणारे वाघाचे हल्ले आणि त्यातील बळी हा गावकऱ्यांसाठी नित्याचाच विषय झाला आहे. जंगलात गवत वेचण्यासाठी गेलेल्या सुरेखा शेंडे या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यु झाला. वाघाच्या भीतीमुळे महिलेचा मृतदेह गावात परत आणण्याचं ग्रामस्थांना धाडस होत नव्हतं. अखेर ग्रामस्थांनी वनअधिकाऱ्यांना मदतीसीठी बोलवलं. मात्र तब्बल 4 तासानंतर वनअधिकारी मदतीसाठी पोहोचले. चार तास उशीर केल्याने गावकरी चांगलेच संतापले. मग संतप्त गावकऱ्यांनी मात्र बैलगाडीवर मृतदेह टाकून बैलगाडीला थेट वनअधिकाऱ्यांनाच जुंपलं. गावकऱ्यांनी वनअधिकाऱ्यांना तब्बल दोन किलोमीटर अंतरापर्यंत बैलगाडी ओढायला लावली. गावकऱ्यांनी घडवलेल्या या अद्दलीतून तरी वनअधिकारी भविष्यात वेळेत मदतीसाठी पोहोचतील अशी आशा गावकऱी व्यक्त करत आहेत

Post a Comment

 
Top