औरंगाबाद : “भाजपमध्ये मुख्यमंत्री कोणाला करायचं हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवतो. ज्याने जास्त दिवस संघाची चड्डी घातली, त्याचा पहिला नंबर लागतो. यामध्ये एकनाथ खडसे अपयशी ठरले असतील, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नसेल",असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. “शिवसेना आणि भाजपमध्ये शहरी नेते आहेत. ग्रामीण भागांचा कदाचित त्यांना अभ्यास नाही. भाजपने मुख्यमंत्री कोणाला करावा, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र नेता निवडीचं काम हे जनता नव्हे, तर संघ ठरवतो. त्यामुळे जो संघाची चड्डी जास्त दिवस घालतो, त्याला पद मिळतं”, असा सणसणीत टोला माणिकरावांनी लगावला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना त्वरीत मदत मिळावी, या आणि अन्य मागण्यांसाठी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. येत्या चार डिसेंबरला जिल्हास्तरावर राज्यभर रास्ता रोको करण्यात येईल, असं माणिकराव म्हणाले. मराठवाड्यामध्ये पाण्याचा दुष्काळ नाही असं म्हणणं योग्य नाही. या मुख्यमंत्र्यांना शेतीतलं काही कळत नाही, असं वाटतयं, असंही माणिकरावांनी नमूद केलं.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment