0

मंगळवेढा / प्रतिनिधी
मंगळवेढा येथे मराठा आरक्षणाला दिलेली
स्थगिती सध्याच्या सरकारने भक्कम बाजू न मांडल्याने दिली आहे. याबाबत उच्च न्यायालयात सरकारने पुर्नविचार याचिका दाखल करावी यासाठी तहसील कार्यालयासमोर मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी लाक्षणिक धरणे आंदोलन केले. गुरूवारी सकाळी हे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष समाधान क्षीरसागर बोलताना म्हणाले की, मराठा समाजास आरक्षण देण्यासाठी सरकारने उच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल करून स्थगिती उठवावी आणि मराठा समाजास ई.एस.बी.सी.चे आरक्षण लागू करावे. यावेळी शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष ईसाक शेख, राहुल सावंजी, राहुल वाकडे, संदिप घुले, दादा सावंजी, दिलावर मुजावर, दिलीप जाधव, संदिप फडतरे, संभाजी सावंजी, शशीकांत चव्हाण, शरद हेंबाडे, अजित मुदगुल, मधुकर मुरडे, भय्या कलुबर्मे आदी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top