पंढरपूर / शहर प्रतिनिधी
शहरात गेल्या अनेक दिवसांपासून धुळीचा प्रचंड त्रास नागरिकांसह व्यापारी, व्यावसायिकांना होत आहे. धुळीमुळे त्रस्त झालेल्या व्यापार्यांनी थेट प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांना निवेदन देवून संताप व्यक्त केला.
विविध भागात रस्त्यांची कामे सुरू आहेत. अनेक कामे कित्येक दिवस रेंगाळत राहत असल्याने प्रचंड धुळीचा सामना अबालवृध्दांना करावा लागत आहे. यापैकीच एक असलेल्या शिवाजी चौक ते चौफाळा या दरम्यानच्या निकृष्ठ रस्त्यामुळे धुळीचे लोट उठत आहेत. यासंदर्भात नगरपालिकेत अनेकवेळा नागरीक, व्यापार्यांनी तक्रारी मांडल्या आहेत. मात्र, ठोस कार्यवाही होत नसल्याने या भागातील व्यापार्यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. तसेच या कार्यालयात धूळफेक आंदोलन करण्याचा इशारा दिला.
दरम्यान्, तहसीलदार गजानन गुरव यांनी तहसील कार्यालयात व्यापार्यांची बैठक बोलावली. यावेळी संबंधित ठेकेदारास १५ दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश गुरव यांनी दिली.
या बैठकीस बजरंग थिटे, अविनाश बडवे, डॉ. प्राजक्ता बेणारे, राज थिटे, अमर मोरे, खलील बागवान, आरिफ तांबोळी, विलास साळुंखे, निखील लाड, सागर बडवे, सचिन शिंदे, अनिल कुलकर्णी, मनोज शिंदे, श्रीकांत वाडेकर, बाळू वाघमारे, मामा बंगाळे, अतुल लटके आदी उपस्थित होते.
Post a Comment