0

सोलापूर / प्रतिनिधी
इंडियन एअर फोर्स अथवा सिव्हील एव्हीएशन या क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी स्वत:वरील बंधने काढल्याशिवाय आपण उडू शकणार आहे. त्या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कॅप्टन स्वप्निल बाहेती यांनी केले. सोलापूर अद्विप प्लाईंग असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर प्लाईंग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अँम्फी थिएटरमध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॅप्टन स्वप्निल बाहेती यांचे ' करिअर इन एव्हेएशन ' या विषयावर तर कॅप्टन रमेश राव यांचे 'जनरल एव्हीएशन' या विषयावर व्याख्यान झाले. स्वप्निल बाहेती यांनी आपल्या व्याख्यानात या क्षेत्रातील करिअरच्या संधी विषयी मार्गदर्शन केले. विमानाचा शोध लागून शंभर वर्षे उलटून गेली तरी आपण त्यापासून खूप लांब आहोत. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रथम स्वत: वरील बंधने काढून टाकण्याची गरज आहे, त्याशिवाय आपण उडू शकणार नाही. या क्षेत्राकडे व्यापक दृष्टीकोनातून पहा. विमान आपल्यासाठी नाही ही मानसिकता काढून टाकण्याची गरज आहे. ग्राउंड हॅँन्डलिंग, पायलट, इंजिनिअर, एअर क्राफ्ट कंट्रोलर, एअरपोर्ट मॅनेजर अशा विविध प्रकारच्या संधी आहेत. कॅबीन क्रू, एअर होस्टेस, फ्लाईंग अटेंडंट यांना तुम्ही वेटर समजू नका, त्यांचे कामही तितकेच महत्वाचे आहे. या क्षेत्रात वयाचे बंधन नाही. १८ ते ५0 वयापर्यंत कोणीही यामध्ये करिअर करु शकतो, असे बाहेती यांनी सांगितले. कॅप्टन रमेश राव यांनी आपल्या व्याख्यानात विमान सेवेविषयी माहिती दिली. विमान हे फक्त श्रीमंत लोक आणि उद्योजकांसाठीच आहे हा गैरसमज काढून टाकण्याची गरज आहे. या क्षेत्रामुळे शिस्त लागते, व्यक्तीमत्व घडते. काळजीपूर्वक काम कसे करावे याची सवय लागते. महाराष्ट्रात दर शंभर मैलावर विमानतळ आहे. त्यामुळे त्याचा फायदा होतो. रोटरी क्लब आणि फ्लाईंग असोसिएशनने भरविलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. असे उपक्रम सातत्याने भरविले पाहिजेत. युरोप, अमेरिकेत असे उपक्रम दर आठवड्याला होत असतात. त्यामुळे तेथे वैमानिकांची संख्या जास्त आहे, असे राव यांनी सांगितले. या कार्यक्रमास रोटरी नॉर्थ ईस्टचे अध्यक्ष राकेश उदगिरी, फ्लाईंग असोसिएशनचे अध्यक्ष पवन मोंढे, नंदकिशोर हबीब, सोमेश्‍वर याबाजी यांच्यासह सर्व पदाधिकारी, विद्यार्थी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

 
Top