मंगळवेढा / प्रतिनिधी
शेतकर्यांना शेतीसंबंधी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी शासनाने कृषी सहाय्यकांची नेमणूक केली खरी परंतु, नियुक्त केलेल्या कृषी सहाय्यकांकडून सर्वसामान्य शेतकर्यांना आवश्यक ते मार्गदर्शन व मदत होतच नसल्याचे चित्र समोर आले आहे. तालुक्यातील बहुतांश कृषी सहाय्यक गावोगावी न जाता मंगळवेढा येथून कारभार करत असल्याने शेतकर्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासन कोट्यवधी रूपये खर्च करून शेतकर्यांसाठी विविध योजना अंमलात आणत असले तरी या योजनांची माहिती कृषी सहाय्यक शेतकर्यांपर्यंत पोहचवत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे योजनांच्या उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम तालुक्यात सर्वदूर होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कृषी विभाग व शेतकरी यांच्यातील दुवा म्हणजे कृषी सहाय्यक आहेत. ग्रामीण भागातील शेतकर्यांना शेतीविषयी योग्य सल्ला, मिळावा, शासनाच्या योजनांची माहिती मिळावी, शेतकर्यांसाठीच्या योजना योग्य प्रकारे राबविण्यात येत आहेत की नाही, याची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी, या उद्देशाने कृषी विभागाने कृषी सहाय्यकांची नेमणूक केलेली आहे. ही सर्व जबाबदारी पार पाडण्यासाठी कृषी सहाय्यकांनी नेमून दिलेल्या गावी म्हणजेच मुख्यालयी राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. गावामध्ये राहून शेतकर्यांच्या गाठीभेटी घेणे, त्यांना शेतीविषयक योग्य मार्गदर्शन करणे, शासनाच्या विविध योजनांची विस्तृत माहिती देणे, पिकांविषयी विस्तृत माहिती देणे आदी कामे कृषी सहाय्यकांनी करणे अपेक्षित आहे. मात्र, तालुक्यातील बहुतांश कृषी सहाय्यक या शासकीय आदेशाची पायमल्ली करत आहेत. नियुक्त गावांमध्ये आठवड्यातून एक किंवा दोन दिवस हे कृषी सहाय्यक भेट देऊ लागले आहेत. कृषी सहाय्यक गावांमध्ये येत नसल्याने शेतकर्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे केवळ आपल्या मर्जीतील शेतकर्यांपर्यंतच या योजनांचा लाभ कसा पोहचवता येईल, यासाठी हे कृषी सहाय्यक प्रय▪करताना दिसतात.
कृषी सहाय्यकांच्या कारभाराविषयी नाराजी कृषी विभागात मोठय़ा प्रमाणावर मनमानी कारभार सुरू असून, अनेक योजनांची अंमलबजावणी पारदर्शकपणे होत नाही. शासकीय योजनांपैकी अनेक योजना केवळ कागदावरच राबविण्यात आलेल्या असून प्रत्यक्षात मात्र काही मोजक्याच धनदांडग्यांना कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. हा प्रकार सध्याही सुरू असून यामध्ये कृषी सहाय्यकांसह कृषी विभागातील काही अधिकार्यांचा सहभाग असून मागील काही काळात राबविण्यात आलेल्या सर्व योजनांची सखोल चौकशी व्हावी व कृषी सहाय्यकांच्या निष्काळजी कारभाराला लगाम कोण घालणार? हा प्रश्न शेतकर्यांतून विचारला जात आहे.
२0११-२0१२ सालचे डाळिंब फळबाग लागवड अनुदानही कृषी सहाय्यकाच्या निष्काळजीपणाने गुंजेगाव सजेतील शेतकर्यांना अद्यापही मिळाले नाही. - चंदू म्हमाणे, शेतकरी, महमदाबाद.
Post a Comment