मंगळवेढा हि संतांची भूमी म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. मंगळवेढा हे तालुक्याचे ठिकाण असून ते सोलापूर जिल्ह्यात येते. हे शहर जिल्हा मुख्यालयापासून नैऋतेला ५४ कि मी अतंरावर आहे. मंगळवेढा हे समुद्र सपाटीपासून ४५८ मीटर उंचीवर आहे. शहरातून दोन राज्य मार्ग जातात. पहिला रत्नागिरी - नागपूर (सोलापूर -मंगळवेढा -सांगोला ) आणि दुसरा अहमदनगर -विजापूर (पंढरपूर-मंगळवेढा -विजापूर ). विठूरायाची पंढरी इथून २३ कि. मी. अंतरावर आहे. अजून एक खासियत आहे ती म्हणजे मंगळवेढा हे ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते.तसा हा पश्चिम महाराष्ट्रातला दुष्काळ ग्रस्त जिल्हा पण सुपीक जमीन असल्या कारणाने इथ ज्वारीच पिक भरपूर येत. मंगळवेढ्याची प्रमुख भाषा मराठी असून तालुक्यातील दक्षिणेकडे कन्नड व मराठी या भाषा बोलल्या जातात. मंगळवेढ्यात सर्व धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. हिंदु-मुस्लिम ऎक्याचे प्रतिक, गैबीपीरचा दर्ग्याला मुस्लिमा बरोबरच हिंदु भाविक ही जातात. तसेच हिंदूच्या सर्व सणांमध्ये मुस्लिम बांधव आनंदाने सहभाग घेतात. नवरात्र महोत्सव मंगळवेढ्यात अतिशय आनंदाने साजरा केला जातो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment