0
 मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
 तालुक्यातील चारही साखर कारखान्यांनी आपला गाळप हंगाम सुरु केल्यामुळे दुष्काळी तालुक्यातील आर्थीक चक्र फिरण्यास सुरुवात झाली आहे. ऊसाच्या गाळपाबरोबर या चार साखर कारखान्यांमध्ये नोकरी करण्याची संधी तालुक्यातील बेरोजगारांना मिळाली आहे. त्यामुळे नोकरीसाठी अन्य जिल्ह्यात होणारे स्थलांतर काही प्रमाणात कमी झाले असले तरी या कारखान्यांमुळे दुष्काळी तालुक्याची ओळख आता औद्यौगीक तालुका अशी होवू लागली आहे. मंगळवेढय़ाचे तत्कालीन नेते कै. कि.रा. र्मदा वकील व रतिलाल शहा यांनी पुढाकार घेवून दामाजी कारखान्याची निर्मिती केली. कारखाना सुरु होण्यापुर्वी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या ऊसाचे गाळप करण्यासाठी अन्य तालुक्यातील कारखानदारांकडे जावे लागत असे पण, हा होत असलेला शेतकर्‍यांचा भोग या दोन नेत्यांनी संपविला होता. दामाजी कारखान्याच्या निर्मितीनंतर या कारखान्याने अनेक चढ उतार पाहिले पण या सर्व संकटांवर मात करित कारखान्याची वाटचाल आजही सुरु आहे. आलेल्या संकटांवर मात करताना जादा वेळ गेल्यामुळे दामाजी कारखान्यात इतर प्रकल्प उभा करण्यात आले नसल्यामुळे अन्य स्पर्धक कारखान्यात मिळणार्‍या दरापेक्षा कमी आहे पण या कारखान्याने मिळवलेला विश्‍वास हा दरापेक्षा मोठा आहे. तालुक्याच्या दक्षिण व पश्‍चिमेकडील काही भाग दुष्काळाच्या झळा सोसत होता पण आजही त्या झळा तशाच आहेत पाण्यासाठी आ. भारत भालके यांनी प्रय▪केले. पाणी मंजूर केले आता निधीसाठी त्यांचे प्रय▪सुरु आहेत. नंदूर येथे फॅबटेक साखर कारखाना सुरु करुन मंगळवेढय़ातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या उसाचे गाळप करण्याचा प्रय▪केला. हा साखर कारखाना सुरु होण्यापुर्वी रेणूका शुगर्स कडे होता. तो सुरु होण्याची उत्सुकता ऊस उत्पादकात होती पण, तो त्यांनी गाळप करण्यापुर्वी फॅबटेक परिवारालो विकला. फॅबटेक तालुक्याबरोबर अन्य तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या ऊसाचे गाळप करत असताना तालुक्यातील तरुणांना नोकरीच्या संधी दिल्या. शिवाय मरवडे परीसरातील छोट्या-मोठय़ा व्यवसायीकांच्या धंद्याला चांगले दिवस आले. याशिवाय माजी आमदार सुधाकर परिचारक, जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक व उमेश परिचारक यांनी 'पांडूरंग' कारखान्याकडे असलेल्या अतिरिक्त ऊसाचा प्रश्न व तालुक्यातील ऊस उत्पादकांचा प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्यात 'युटोपियन शुगर्स' कारखाना सुरु केला. तर लवंगीच्या माळरानावर भैरवनाथ शुगर्सचे अध्यक्ष प्रा. तानाजीराव सावंत, प्रा. शिवाजीराव सावंत व कार्यकारी संचालक अनिल सावंत या सावंत बंधूनी 'भैरवनाथ शुगर लि युनिट ३' ची निर्मिती करुन मंगळवेढय़ाच्या दुष्काळी दक्षिण भागात नवीन औद्योगीक पर्व सुरु केले. या साखर कारखान्यामुळे लवंगीचा उजाड परीसर आता कामगार ऊस वाहतूक वाहने व धंद्यामुळे भरुन आला. या कारखान्यात अन्य प्रकल्प असल्यामुळे शेतकर्‍याला चांगल्या दराची अपेक्षा आहे. या साखर कारखान्याची सुरुवात होण्यापुर्वी या भागातील तरुणांना रोजगारासाठी पुणे, मुंबई, चाकण या भागात जावे लागत होते. त्यामधील काही तरुणांना या कारखान्यामुळे रोजगार मिळू लागला तर ऊसतोड मजुरांना रोजगारासाठी सांगली कोल्हापूर व कर्नाटकातील काही भागात ऊसतोडणीसाठी जावे लागते. त्या मजुरांनी तालुक्यात ऊसतोडणी सुरु केली. शिवाय छोट्या-मोठय़ा व्यावसायीकांनी सुरु केलेले धंदे ग्राहकांच्या गर्दीमुळे फुलू लागले आहेत. 

Post a Comment

 
Top