0

मंगळवेढा / प्रतिनिधी
परराज्यातील व्यक्तींची माहिती पोलिसांना न कळवल्याप्रकरणी भिमराव रामण्णा जाधव (रा.शरद कॉलनी,मंगळवेढा) याच्याविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती, देशात व महाराष्ट्रात अतिरेकी कारवायामध्ये वाढ झालेली आहे. अतिरेकी कारवाई करणारे लोक एखाद्याच्या घरी भाडेकरी म्हणून राहून आपले काम फत्ते करतात. याला आळा घालण्यासाठी मंगळवेढा पोलीस ठाण्यात ए.टी.सी. पथक कार्यरत असून या पथकाने मंगळवेढा शहरातील लोकांना आपल्याकडे भाडेकरू असल्यास त्यांची माहिती पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले होते. ए.टी.सी.पथकाचे प्रमुख सोमनाथ भट व विठ्ठल साळुंखे यांनी दि.६ डिसेंबर रोजी दामाजी चौकात व्यवसायिकांची चौकशी केली असता भिमराव रामण्णा जाधव याच्या चायनीज गाड्यावर किरण बहादूर धिमाल (रा.मोरग,नेपाळ) काम करीत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित व्यक्तीस राहण्यास आश्रय देवून त्याची माहिती देणे गरजेचे असतानाही पोलिसांना माहिती दिली नाही तसेच त्याबाबतचे रजिस्टर ठेवले नाही. पोलिसांनी नोटीस देवूनही कामगाराची माहिती न दिल्यामुळे जाधव यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर बिटचे पोलीस हवालदार सुनिल देवकर करीत आहेत.

Post a Comment

 
Top