0

सोलापूर/प्रतिनिधी
राज्यातील विशेषत: पश्‍चिम महाराष्ट्रातील दूध खरेदी-विक्रीचे दर कोसळल्याने दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. १६) नागपुरात दिल्याची माहिती जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी दिली. मुख्यमंत्र्यांसमोर आपले म्हणणे मांडताना प्रशांत परिचारक यांनी महासंघाचा दूध पावडर निर्मिती कारखाना त्वरीत चालू करणे आवश्यक आहे, तसेच अतिरिक्त दुधाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने पुढाकार घेवून अतिरिक्त दुधाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने पुढाकार घेवून अतिरिक्त दूध स्वत: खरेदी करून स्वत:चे दूध प्लॅन्ट चालू करावेत, असे सांगितले. यावेळी विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे-पाटील यांनीही दूध पावडर उत्पादन करणार्‍या कंपन्यांनासुध्दा सध्या तोटा सहन करावा लागत असल्याचे सांगून निर्यात होणार्‍या दूध पावडरकरिता १0 टक्के अनुदान मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, असे नमूद केले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्याबाहेरील येणार्‍या दुधावर बंदी घालणे, कर लावणे आवश्यक असल्याचे नमूद केले. यामुळे राज्यातील अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण होणार नाही, असा आशावाद मांडला. दरम्यान, या सर्व मुद्दय़ांवर शासन सकारात्मक विचार करून शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करेल, दूध उत्पादक शेतकर्‍यांना व जिल्हा दूध संघांना सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी ना. हरिभाऊ बागडे, ना. एकनाथराव खडसे, आ. गणपतराव देशमुख, आ. मधुकरराव चव्हाण, दिलीप वळसे-पाटील, आ. हनुमंतराव डोळस, आ. सुभाष देशमुख, नागपूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन राजाभाऊ ठाकरे, बीडचे बांगर, दूध संघाचे संचालक राजेभोसले यांची उपस्थिती होती.

Post a Comment

 
Top